Apple कंपनी तर्फे खास सोहळ्यात iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max करण्यात आले लाँच; जाणून घ्या या किंमत व खासियत
I Phone 11 Launch (Photo Credits: File Image)

जगविख्यात स्मार्टफोन विक्रेती कंपनी Apple तर्फे आज एका खास सोहळ्यात I Phone 11 आयफोन 11 प्रो , व आयफोन 11 प्रो मॅक्स लाँच करण्यात आला. कॅलिफोर्निया मधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा बहुप्रतीक्षित दिमाखदार सोहळा पार पडला. यामध्ये आयफोनच्या तीन नव्या मॉडेल्स सहित अॅपल आयपॅड (Apple I Pad), अॅपल टीव्ही प्लस (Apple Tv Plus) व अॅपल वॉच (Apple Watch) ' हे देखील लाँच करण्यात आले. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले होते. जगभरातील अॅपल च्या चाहत्यांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला..

चला तर मग पाहुयात या सोहळ्यात अॅपल तर्फे घोषित करण्यात आलेल्या आहि खास गोष्टी..

iPhone 11

आयफोन 11 मध्ये विशेषतः 6.1 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले असणार आहे . सोबतच यामध्ये 12 मेगापिक्सेल क्षमतेचे दोन कॅमेरा असणार आहेत. यातील एक कॅमेरा हा वाईड तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड स्वरूपात वापरता येणार आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य असे की यातून तुम्ही 4K दर्जाचे व्हिडीओ शूट करू शकता. तसेच सेल्फी कॅमेऱ्यासाठी देण्यात आलेले खास स्लो मोशन फीचर व जुन्या मॉडेलहून अधिक काळ टिकणारा बॅटरी बॅकअप हा फोनला खास बनवतो. आयफोन 11 हा सहा नव्या रंगामध्ये लाँच झाला असून याची सुरुवाती किंमत ही 699  डॉलर इतकी असणार आहे.

iPhone 11 Pro

या मॉडेल मध्ये युजर्सना ट्रिपल-कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा, अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि झूम लेंस कॅमेरा असे तिन्ही कॅमेरे हे 12 मेगापिक्सल क्षमतेचे असणार आहेत. फोनचा बाहेरील भाग हा पूर्णतः मॅट फिनिशिंग सह असून सोबतच काचेची बॉडी असणार आहे. हा फोन कंपनीद्वारे ग्रीन मिडनाइट रंगात सादर करण्यात आला आहे. हा फोन 5.8-इंच आणि 6.5-इंच OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले अशा रूपात मार्केट मध्ये उपलब्ध असणार आहे. यामधील सुपरफास्ट चार्जिंग फीचर हे लक्षवेधी आहे. तसेच डीप फ्यूजन व व्हिडीओ एडिटिंग टूल्स मुळे हे मॉडेल खास ठरत आहे. iPhone 11 प्रो ची सुरुवाती किंमत 999 डॉलर आहे.

iPhone 11 Pro Max

हे आतापर्यंतचे सर्वात लेटेस्ट मॉडेल असून यामध्ये सुपर पॉवरफुल कॅमेरा देण्यात आला आहे. iPhone 11 Pro Max ची सुरुवाती किंमत 1,099 डॉलर इतकी असणार आहे.

अॅपल टीव्ही प्लस

आजच्या सोहळ्यात कंपनीद्वारे अॅपल टीव्ही प्लस एकाच वेळी शंभर देशांमध्ये लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा झाली आहे. या टीव्हीमध्ये अनेक ओरिजनल टीव्ही शो प्रसारीत होणार असून आयफोन 11 सोबतच या टीव्हीचे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

इथे पहा लाईव्ह स्ट्रीमिंग

दरम्यान, आज घोषित करण्यात आलेले हे मॉडेल्स 13 सप्टेंबर पासून खरेदी करता येणार असल्याचे समजत आहे.