Vivo U20: बॅटरी, फास्ट चार्जिंग, डिस्प्ले, कॅमेरा यांसारख्या दमदार फीचर्स चा नवा स्मार्टफोन आज भारतात झाला लाँच; पहा काय आहे किंमत
Vivo U20 (Photo Credits: YouTube)

डिस्प्ले, कॅमेरा, मेमरी याबाबतीत अव्वल असलेल्या स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो ने अल्पावधीत भारतीयांची मने जिंकली. आपल्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी ग्राहकांची मने जिंकून विवोने भारतीय बाजारात चांगलाच जम बसवला. त्याच्या आकर्षक फिचर्समुळे आज आज विवो काही बाबतीत अगदी आयफोनलाही टक्कर देतोय असं म्हणायला हरकत नाही. त्यात एक पाऊल पुढे टाकत विवो ने आज आपला नवीन स्मार्टफोन Vivo U20 भारतात लाँच केला. #Unstoppable Performance असे या स्मार्टफोनबद्दल बोलल जातय त्याचे कारणही तशीच आहेत. थक्क करणारी याची वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

या स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये स्टॅडर्ड क्लिअर केस कव्हर देण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉक की, स्क्रॅच गार्ड आणि वॉरंटी कार्ड देण्यात आले आहे. त्याचबरोबर चार्जिंग वायर आणि 18W ड्यूल इंजिन फास्ट चार्ज देण्यात आला आहे.

उत्कृष्ट डिस्प्ले, जबरदस्त कॅमेरा, जलद गतीने चार्जिंग करण्याची सुविधा, उत्कृष्ट कामगिरी ही त्यांची USP आहे. याच्या खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया सविस्तर:

याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट देण्यात आले आहे. याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 18W ड्यूल इंजिन फास्ट चार्ज फिचर देण्यात आले आहे. तसेच याच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर यात U20 ला 6.53 इंचाची Halo+ FHD फुल स्क्रीन देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- Vivo V17 Pro स्मार्टफोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी, जाणून घ्या फिचर्स

यात LPDDR4X 6GB रॅम आणि UFS 2.1 स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोन गेमिंग चाहत्यांसाठी अल्ट्रा गेम मोड देण्यात आला आहे. याचे पुर्ण चार्जिंग 2 दिवसांपर्यंत चालू शकते. हा स्माटफोन अन्य स्मार्टफोन्सना देखील चार्ज करु शकतो.

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात AI ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 16MP Sony IMX499 सेंसर असून यात नॉमेल आणि सुपर नाईट मोड देण्यात आला आहे. 8MP सेकंड कॅमेरा हा अल्ट्रा वाइल्ड लेन्सचा असून तिसरा कॅमेरा 2MP चा असून यात सुपर मॅक्रो लेन्स देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB रोम ची किंमत 10, 990 रुपये असून 6GB रॅम आणि 64GB रोमची किंमत 11,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध होईल.

हा स्मार्टफोन रेसिंग ब्लॅक आणि ब्लेज ब्लू या दोन रंगात उपलब्ध होणार असून याच्या मागील बाजूस 3D कर्व्ड कव्हर देण्यात आला आहे.