Vivo V17 Pro स्मार्टफोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी, जाणून घ्या फिचर्स
Vivo V17 Pro (Photo Credits-Twitter)

बाजारात विविध कंपनीचे स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत.त्यामधीलच एक चीन कंपनीचा मिड-रेंज प्रिमियम स्मार्टफोन Vivo V17 Pro ची किंमत कमी झाली आहे. या स्मार्टफोनची किंमत चक्क 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कंपनीने वीवो वी17 प्रो गेल्याच महिन्यात लॉन्च केला होता. यामध्ये 8GB RAM आणि 128GB चा स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन बाजारात नुकताच लॉन्च केला त्यावेळी त्याची किंमत 29,990 रुपये ठेवण्यात आली होती.मात्र आता किंमतीत घट केल्याने तो ग्राहकांना 27,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

वीवो वी17 प्रो ची नवी किंमत अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन जर तुम्हाला खरेदी करायचा नसल्यास तुम्ही स्टोरमधून ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. वीवो कंपनी हा स्मार्टफोन मिडनाइट ओशन ग्लेशियर आइस रंगामध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रेजॉल्यूशन 2340 x 1080 पिक्सल आहे. वीवोचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसवर काम करतो. स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास 4,100mAh बॅटरी देण्यात आली आहे.(Amazon Great Indian Festival Sale: 21 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु होणार सेल, ग्राहकांना खरेदीवर मिळणार दमदार ऑफर्स)

तसेच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये क्वॉड सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच 8 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सलचा कॅमेरा ही स्मार्टफोनसाठी देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे. स्मार्टफोनला इन-डिस्प्ले-फिंगरप्रिंट सेंसर ही दिला आहे.