Amazon Great Indian Festival Sale: 21 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु होणार सेल, ग्राहकांना खरेदीवर मिळणार दमदार ऑफर्स
Amazon Great Indian Festival (Photo Credits-Twitter)

Amazon Great Indian Festival येत्या 21 तारखेपासून सुरु होणार असून 25 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामध्ये युजर्सला प्रत्येक वस्तूच्या खरेदीवर दमदार ऑफर्स मिळणार आहेत. दिवाळीचा सण ही अवघ्या काही दिवसांवर आल्याने अॅमेझॉनच्या या सेलचा नक्कीच लाभ सर्वांना घेता येणार आहेत. खासकरुन इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर शानदार सूट सेल दरम्यान ग्राहकांना देण्यात येणार आहे.

सेलमध्ये उपलब्ध होणाऱ्या स्मार्टफोनबाबत बोलायचे झाल्यास येथे No EMI Cost ऑप्शनसह एक्ससेंज ऑफऱ जवळजवळ 40 टक्क्यांपर्यंत मिळणार आहे. तसेच स्मार्टफोन खरेदीवर फ्री स्क्रिन रिप्लेसमेंटची सुविधा ही देण्यात येणार आहे. या सेल दरम्यान लोकप्रिय स्मार्टफोन ब्रॅन्ड Apple, Xiaomi, OnePlus आणि Samsung च्या स्मार्टफोनवर डिस्काउंटसह अन्य ऑफर्ससुद्धा मिळणार आहेत. अॅमेझॉनचा हा सेल 21 ऑक्टोबरला रात्री 11.59 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर प्राइम मेंबर्ससाठी हा सेल एक दिवस आधी सुरु म्हणजेच 20 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.

सेलदरम्यान जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास तर तुम्ही नुकत्याच लॉन्च झालेल्या One Puse 7T सह Samsung M30s, Vivo U10  आणि Redmi Note 8 सीरिजवर शानदार नो कॉस्ट ईएमआय आणि एक्ससेंज ऑफर मिळणार आहे. त्यामुळे त्याची मूळ किंमतीच्या तुलनेत कमी किंमतीत तुम्हाला स्मार्टफोन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच मोबाईल एक्ससरीजची किंमत 49 रुपयांपासून सुरु होणार आहे. (यंदाची दिवाळी होणार खास! HDFC बँक ग्राहकांना खरेदीवर मिळणार भरघोस सवलत)

तसेच अन्य ऑफर्सबाबत ग्राहकांना सेलमध्ये Axis Bank आणि Citi Bank च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन वस्तूचे पैसे भरल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही सूट Rupay कार्डसाठी सुद्धा ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत सूट, होम अप्लायंन्स आणि टीव्ही खरेदीवर 60 टक्के सूट मिळणार आहे.