यंदाची दिवाळी होणार खास! HDFC बँक ग्राहकांना खरेदीवर मिळणार भरघोस सवलत
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

दिवाळीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वत्र आता खरेदी करण्याची स्थिती आणि नागरिकांची दिवाळीसाठीची लगभग दिसून येत आहे. मात्र यंदाची दिवाळी काही खासच ठरणार आहे. कारण ग्राहकांना खरेदीवर आता भरघोस सूट मिळणार असून यासाठी एचडीएफसी बँक पुढे आली आहे. त्यानुसार एचडीएफसी बँकेच्या महिनाभराच्या सेलमध्ये ग्राहकांना सवलतींसह कॅशबॅक ही मिळणार आहे.

एचडीएफसीच्या 'फेस्टिव्ह ट्रीट' मध्ये ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा अधिक वस्तूंवर भारी डिस्काउंट देण्यात येणार आहे. तसेच बँकिंग प्रोडक्ट्स, कार लोन आणि पर्सनल लोनवर सुद्धा भारी सूट ग्राहकांना मिळणार आहे. सवलतींव्यतिरिक्त दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूसांठी एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरल्यास सूट दिली जाणार आहे. तर दिवाळीच्या सणाात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंवर सूट दिली जाते. त्यामुळे हिच वेळ असते जेव्हा सूट दिलेल्या आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करता येतात. तर जाणून घ्या कोणत्या वस्तूंवर एचडीएफसीचे कार्ड वापरुन तुम्हाला कॅशबॅक किंवा सूट दिली जाणार आहे.

-HDFC बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन iPhone 11 खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्यावर 7 हजार रुपयांचा कॅशबॅकसह EMI सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे.

-Xiaomi, Vivo आणि Oppo स्मार्टफोन खरेदीवक 10 टक्के कॅशबॅक सोबत Samsung स्मार्टफोनवर 15 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

-रिलयान्स डिजिटल आणि जिओ डिजिटल लाइफवर 10 टक्के कॅशबॅक ग्राहकांना दिला जाणार आहे.

-काही इलेक्ट्रिक वस्तू खरेदीवर 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI सुविधा उपलब्ध आहे.

-लेटेस्ट Oneplus स्मार्टफोनवर 3 हजार रुपयांपर्यंतचा इन्टंट सूट, HDFC बँकेचे डेबिट, क्रेडिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅक आणि 6 महिन्यांपर्यंत नो EMI कॉस्ट सुविधेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.(Amazon Great Indian Festival 2019 सेलमध्ये ग्राहकांना फक्त 4,999 रुपयात खरेदी करता येणार Redmi 7A, जाणून घ्या ऑफर्स)

त्यामुळे यंदाच्या दिवाळीला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसह अन्य गोष्टींवर एचडीएफसी बँकेच्या कार्डवर भरघोस सूट मिळणार आहे. तसेच ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी केल्यास सवलत मिळणार आहे.