Amazon Great Indian Festival 2019 सेलमध्ये ग्राहकांना फक्त 4,999 रुपयात खरेदी करता येणार Redmi 7A, जाणून घ्या ऑफर्स
Amazon Great Indian Sale (Photo Credits-Twitter)

Amazon Great Indian Festival 2019: अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल  2019 येत्या 13 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. तर अॅमेझॉनच्या प्राइम युजर्ससाठी हा सेल उद्या (12 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सेल 17 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन,लॅपटॉप, हेडफोन, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रिक प्रोडक्ट्सवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. त्याचसोबत ICICI Bank च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरुन पेमेंट केल्यास युजर्सला 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. त्याचसोबत No Coast EMI आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जाणार आहे.

तर One plus 7 ग्राहकांना 32,99 रुपयांऐवजी 29,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत One Plus 7 Pro ची सुद्धा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन 48,00 रुपयांऐवजी 44,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. एवढेच नाही तर iPhone XR वर भरघोस सूट देण्यात येणार असून 44,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.(Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्टवर 12 ऑक्टोबरपासून बंपर दिवाळी सेल; मोबाइल, टीव्ही, कपड्यांवर भरघोस सूट, पहा डिटेल्स)

सॅमसंग गॅलेक्सी एम 30एस स्मार्टफोनवर 1 हजार रुपयांची सूटसह उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर गॅलेक्सी एम10एस स्मार्टफोन 8,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची मूळ किंमत 10 हजार रुपये आहे. एवढेच नाही तर गॅलेक्सी ए 50 स्मार्टफोन ग्राहकांना 24,000 रुपयांऐवजी 18,990 रुपये खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार आहेत.

परंतु जर बजेट सेगमेंट बाबत बोलायचे झाल्यास Redmi 7A वर सूट दिल्यानंतर तो फक्त 4,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 6,4999 रुपये आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एम 30 स्मार्टफोन 11,000 रुपयांऐवजी 9,999 रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. याचसोबत अन्य स्मार्टफोनवर ही शानदार सूच दिली जाणार आहे.