Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्टवर 12 ऑक्टोबरपासून बंपर दिवाळी सेल; मोबाइल, टीव्ही, कपड्यांवर   भरघोस सूट, पहा डिटेल्स
फ्लिपकार्ट दिवाळी सेल (Photo Credit : Facebook)

नुकतेच दसऱ्यानिमित्त ई कॉमर्स कंपन्या Amazon आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांनी फार मोठ्या सेलचे आयोजन केले होते. दोन्ही कंपन्यांनी यामध्ये प्रचंड नफा कमावला. आता अमेरिकन कंपनी वॉलमार्टच्या मालकीची देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बिग दिवाळी सेलची (Big Diwali Sale) घोषणा केली आहे. या वेळी हा सेल 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. महत्वाचे म्हणजे फ्लिपकार्ट प्लसचे वापरकर्ते 4 तासांपूर्वी म्हणजेच, 11 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून या सेलचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या सेलला जे ग्राहक मुकले आहेत  त्यांच्यासाठी ही फार चांगली संधी असणार आहे.

फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, बिग दिवाळी सेलमध्ये टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये 50 हजाराहून अधिक उत्पादने उपलब्ध असतील. याशिवाय कार्डलेस क्रेडिट सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सोबतच टॉप ब्रँडच्या स्मार्टफोनवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये रेडमी नोट 7, रेडमी नोट 7 एस, रियलमी 5, व्हिवो झेड 1 प्रो आणि रियलमी सी 2 यासह अनेक मोठ्या ब्रँड स्मार्टफोन सवलतीच्या दरात उपलब्ध असतील.

या सेलमध्ये विक्रेत्यांकडून इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 90 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय आणि प्रॉडक्ट एक्सचेंजची सुविधादेखील मिळणार आहे. विविध फॅशन ब्रँडवर 50 ते 80 टक्के सूट मिळू शकते. फ्लिपकार्टच्या या मोठ्या दिवाळी सेलमध्ये 'धमाका डील' नावाचे फ्लॅश सेल देखील आयोजित केले जाईल. यामध्ये मोबाइल फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर दररोज सकाळी 12, 8 आणि संध्याकाळी 4 वाजता जादा सूट दिली जाईल.