Donald Trump | (फोटो सौजन्य - Instagram)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump)  यांच्याकडून आकारल्या जाणार्‍या टेरिफ प्लॅन कडे जगाचं लक्ष होते. दोहा येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी असा दावाही केला की भारताने अमेरिकेला परस्पर आधारावर जवळजवळ नो-टॅरिफ कराराची ऑफर दिली आहे.यावेळी त्यांनी झिरो टेरिफ बद्दल भाष्य केले असले तरीही अ‍ॅपलचे सीईओ भारतामध्ये करत असलेली आयफोनची निर्मिती यावरून नाराज आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अ‍ॅपलचे सीईओ Tim Cook यांना भारतात अधिक उत्पादन सुविधा उभारण्याची त्यांची योजना सोडून देण्यास आणि त्याऐवजी अमेरिकेत अ‍ॅपलचे प्लांट बांधण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले असल्याचेही समोर आले आहे. "अॅपल अमेरिकेत आपले उत्पादन वाढवेल." भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेचा एक भाग म्हणून, भारताच्या वाणिज्य विभागाच्या प्रतिनिधींनी आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या प्रतिनिधींनी 23-25 एप्रिल दरम्यान वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा केली, यावरुन 2025 च्या फॉल पर्यंत (सप्टेंबर-ऑक्टोबर) द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण होईल. असे सांगितले जात आहे.

सुरूवातीच्या काही रिपोर्ट्सनुसार, अॅपल अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी असलेल्या सर्व आयफोन उत्पादनांना भारतात हस्तांतरित करण्याच्या तयारीत आहे. भारतात उत्पादन वाढवण्याचा अॅपलचा निर्णय चीनपासून दूर उत्पादन ऑपरेशन्समध्ये विविधता आणण्याच्या त्याच्या व्यापक उद्दिष्टाचा भाग आहे.

डॉ. एस जयशंकर यांची भारत-अमेरिका ट्रेड डिल वर प्रतिक्रिया

कोणताही परस्पर फायदेशीर असला पाहिजे; तो दोन्ही देशांसाठी काम करणारा असावा. व्यापार कराराकडून आमची हीच अपेक्षा असेल. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत त्यावर कोणताही निर्णय घेणे अकाली ठरेल. असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले आहेत.