COVID 19 च्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेले PUBG 24 तासाच्या शटडाउन नंंतर आज पुन्हा सुरु
PUBG (Photo Credit: File Photo)

मोबाईल गेम्स मधील टॉप 1 वरील खेळ म्हणजे पबजी (PUBG). अलीकडे कोरोना व्हायरसच्या लॉक डाऊन (Coronavirus Lock Down ) काळात तर अनेकांचे मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणजे हा गेम आहे. पण याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पबजी च्या निर्मात्या कंपनीकडून हा गेम ऍप 24 तासासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार काल 4  तारखेच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते आज 5 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत पबजीचे 'शटडाऊन' असणार होते. काल दिवसभर पबजी बंद राहिल्यानंतर आज मध्यरात्रीपासुन पबजी ने आपली सेवा पुन्हा सुरु केली आहे. चीन च्या वुहान (Wuhan) शहरातून सुरु झालेलं कोरोना संकट जवळपास सर्व जगभर पसरले आहे, या संकटापासून लोकांचे रक्षण करताना काही डॉक्टरांचा सुद्धा बळी गेला आहे.  हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. या सर्वांच्या प्रति आदरांजली व्यक्त करण्यासाठी आज 24 तास आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय पबजी तर्फे घेण्यात आला होता. (हेही वाचा: Coronavirus: महाराष्ट्र, नवी दिल्ली सह जाणून घेऊया भारतातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण आकडेवारी)

पबजी आणि कोरोनाचा तसा थेट संबंध काय? लॉक डाऊन मुळे हा निर्णय घेण्यात आलाय का? असे प्रश्न तुम्हाला आता पडले असतील तर याचे उत्तर कंपनीने नोटिफिकेशन पाठवुन युजर्सना दिले होते. वास्तविक पबजी शटडाऊनचा लॉक डाऊनशी संबंध नाही, मात्र जगभरात कोरोनाच्या हाहाकारामुळे मृत झालेल्या सर्वांना आदरांजली वाहण्याचा मार्ग म्ह्णून हा निर्णय घेण्यात आला आहे असे पबजी तर्फे कळवण्यात आले होते.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात 63,924 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे यापैकी सर्वाधिक मृत्यू हे युरोपमध्ये झाले आहेत. यासह कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या जगभरात 1,182,827 वर गेली आहे यातील निम्म्याहून अधिक प्रकरणे ही युरोपमध्ये (6,10,846) आहेत. अमेरिकेत 2,90,219 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर आशियामध्ये 1,15,777 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे संकट रोखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.