Coronavirus: महाराष्ट्र, नवी दिल्ली सह जाणून घेऊया भारतातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण आकडेवारी
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतात (India) कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून हा आकडा आज दिवसभरात 3113 वर जाऊन पोहोचला आहे, अशी माहिती ICMR ने दिली आहे. यात 2825 सक्रिय केसेस असून 212 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्याचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यात महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या 635 वर जाऊन पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोना बाधित 145 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 635 झाली. आतापर्यंत 52 करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर 32 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर भारतात महाराष्ट्रानंतर नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 460 वर जाऊन पोहोचली आहे. यात भारतातील 30% रुग्ण हे तबलिगी जमातीच्या कार्यक्रमातील आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. Coronavirus: मुंबईत आज कोरोनाचे नवे 52 रुग्ण आढळले तर 4 जणांचा मृत्यू, महापालिकेने दिली माहिती

तर मुंबईत आज कोरोना व्हायरसचे 52 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 377 झाली आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. कोरोना व्हायरच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. तसेच राजेश टोपे यांनी आपल्याकडे मुबलक प्रमाणात मास्क आणि व्हेंटिलेटर्सची संख्या असल्याचे सांगितले आहे. मात्र तरीही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तर आज मुंबईत कोरोनामुळे मृतांचा आकडा 22 वर पोहचला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात खरोखरच आता संकटाचा काळ आहे देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत.