
Chhava OTT Release Date: विक्की कौशल (Vicky Kaushal) चा 'छावा' (Chhava) हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Chhava OTT Release) येण्याची तयारी करत आहे. छावा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर लोक घरबसल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहू शकतात. ओटीटीप्लेच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने छावा चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत.
'छावा' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार?
मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकतील. तथापि, निर्मात्यांनी अद्याप ओटीटी रिलीज तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. साधारणपणे, चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किमान 45 ते 60 दिवसांनी ते ओटीटीवर रिलीज करण्यात येतात. (हेही वाचा - Vicky Kaushal Recites Marathi Poem: मनसे च्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात जेव्हा विकी कौशल ने सादर केली कुसुमाग्रजांची 'कणा..' कविता (Watch Video))
दरम्यान, 'छावा' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. रिलीजच्या दोन दिवसांतच चित्रपटाने 67.5 कोटी रुपये कमावले. उत्कृष्ट अभिनयामुळे आणि चित्रपटाच्या ऐतिहासीक कथेमुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपट लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. विकी कौशल व्यतिरिक्त, या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, डायना पेंटी आणि संतोष जुवेकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.