MP News

MP News:  'बेंथो' नावाच्या जर्मन शेफर्डने आपला मालक शिवम बरगैया याला वाचवण्यासाठी वाघाचा सामना केला. श्वान हा प्राणी यांच्या निष्ठेसाठी ओळखला जातो. मालकासाठी श्वानाने प्राणाची आहुती दिल्याच्या अनेक घटना सभोवताली घडत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्या प्रमाणे बेंथोने आपला जीव गमावला पण आपल्या मालकाला सुखरूप वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम शेतात पहारा देत असताना पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. अचानक जंगलातून एक वाघ बाहेर आला आणि त्याने शिवमवर हल्ला केला. वाघाने हल्ला करण्यापूर्वी त्यांचा निष्ठावंत कुत्रा बेंथो पुढे आला आणि जोरजोरात भुंकत वाघावर हल्ला केला. बेंथोने पूर्ण ताकदीनिशी वाघाला रोखण्याचा प्रयत्न केला, पण वाघाने त्याला गंभीर जखमी केले.

जर्मन शेफर्ड 'बेंथो'चा वाघाशी सामना

शेवटच्या श्वासापर्यंत वाघाशी झुंज दिली

बेंथोने शेवटच्या श्वासापर्यंत वाघाशी लढा दिला आणि अखेर वाघाला पळून जाण्यास भाग पाडले. मात्र या लढाईत बेंथो गंभीर जखमी झाला. शिवमने आपल्या जखमी कुत्र्याला तात्काळ २५ किलोमीटर दूर पशुवैद्यकाकडे नेले, पण सर्व प्रयत्न करूनही बेंथोला वाचवता आले नाही.