Dead | (Photo credit: archived, edited, representative image)

Kerala Shocker: केरळ येथे मुलीच्या आजाराला कंटाळून व्यापारी आणि त्यांची ऑटिझम ग्रस्त  23 वर्षीय मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री बेहाला येथील शकुंतला पार्कमध्ये घडली. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, दास यांना मुलगी श्रीजा च्या ऑटिझमवर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि देशभरातील रुग्णालयांना भेटी देऊनही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसली नाही, ज्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला.साजन दास आणि त्यांची मुलगी श्रीजा दास असे मृतांचे नाव आहे. 

साजनने आत्महत्या करण्यापूर्वी आधी मुलीला मारले, असा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून तपास सुरू आहे.  वृत्तानुसार, वॉटर प्युरिफायर आणि चिमणी दुरुस्त करून विकण्याचा व्यवसाय करणारे साजन दास गेल्या तीन वर्षांपासून फुटा रोडवरील एका फ्लॅटमध्ये राहत होते.