
Raksha Khadse’s Daughter Harassed: केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची (Daughter) रविवारी जळगावच्या कोथळी गावात यात्रेदरम्यान काही टवाळखोर मुलांनी छेड काढली. यानंतर रक्षा खडसे यांनी हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुक्ताईनगर येथील महाशिवरात्री मेळाव्यात ही घटना घडली, जिथे तरुणांच्या एका गटाने रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. या तरुणांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचे फोटो काढण्याचा तसेच तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर, रक्षा खडसे त्यांच्या मुलीसह, मोठ्या संख्येने समर्थक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचल्या. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून नाही तर न्याय मागणारी आई म्हणून पोलिस ठाण्यात आली आहे.'
महिलांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना त्यांनी प्रश्न केला की, 'जर आमच्यासारख्या कुटुंबातील मुली सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचे काय? जर माझी स्वतःची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांची काय अवस्था असेल? कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मी राज्य सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करेन. जर लोकप्रतिनिधीच्या मुलीचा छळ होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? मी मुख्यमंत्र्यांना भेटून अशा घटनांवर कारवाईची मागणी करेन, असे रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
Muktainagar, Maharashtra: Union Minister of State for Youth Affairs and Sports, Raksha Khadse, says, "...The night before last, my daughter went to the fair, and this incident took place. Some boys harassed her..." https://t.co/zO4CdZNugF pic.twitter.com/DnZEXNW9MX
— IANS (@ians_india) March 2, 2025
रक्षा खडसे यांनी म्हटलं की, आरोपींबद्दलच्या तक्रारी आधीच पोलिसांकडे आल्या आहेत. या टवाळखोर मुलांनी चार-पाच मुलींचे व्हिडिओ काढले. सध्या राज्यभरात महिलांवरील गुन्हे वाढले आहेत आणि आरोपींना आता कायद्याची भीती वाटत नाही. अनेक मुली पुढे येण्यास कचरतात, परंतु आपण गप्प बसू नये. म्हणूनच मी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत. 2014, 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. सध्या त्या मोदी सरकारमधील सर्वात तरुण महिला मंत्री म्हणून काम करत आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या मोदी 3.0 मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांच्याकडे युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.