
Common University Entrance Test-Undergraduate अर्थात साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज अधिकृत वेबसाईट cuet.nta.nic.in वर दाखल करावे लागणार आहे. ही अर्जप्रक्रिया 22 मार्च पर्यंत सुरू असणार आहे. ही परीक्षा Computer-Based Test द्वारा घेतली जाणार आहे. 8 मे ते 1 जून 2025 दरम्यान या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेचं विषयानुसार वेळापत्रक काही दिवसांनी जारी केले जाणार आहे. application correction window ही मार्च 24 ते मार्च 26 दरम्यान खुली असेल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- वैध इमेल आयडी आणि मोबाईल नंबर
- दहावी, बारावीची मार्क्स शीट आणि सर्टिफिकेट्स
- स्कॅन केलेले फोटोग्राफ आणि सही
- जन्मतारखेचे प्रमाणपत्रक
- पीडीएफ मध्ये Category certificate (if applicable)
- पेमेंट साठी बॅंक डिटेल्स
पात्रता निकष काय?
- 10+2 अशा राज्य/ केंद्रीय बोर्ड मधून परीक्षा उत्तीर्ण
- इंटरमिजिएट किंवा दोन वर्षांची प्री-युनिव्हर्सिटी परीक्षा पूर्ण केली असावी
- किमान पाच विषयांसह वरिष्ठ माध्यमिक परीक्षा (NIOS) पास केली
- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण
- तीन वर्षांचा AICTE/राज्य बोर्ड-मान्यताप्राप्त डिप्लोमा आहे.
CUET UG 2025 साठी अर्ज कसा कराल?
- cuet.nta.nic.in वर क्लिक करून रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा.
- लॉगिन करून अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्र भरून अॅप्लिकेशन फी भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि confirmation page डाउनलोड करा.
उमेदवारांनी त्यांचा ईमेल आयडी आणि फोन नंबर बरोबर असल्याची खात्री करावी, कारण सर्व माहिती ईमेल किंवा एसएमएसद्वारे पाठवले जाईल.