
मुंबई (Mumbai) मध्ये घाटकोपर (Ghatkopar) भागात बापानेच पोटच्या पोरीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिसरं मूल नको म्हणून बापानेच आपल्या अवघ्या चार महिन्याच्या मुलीचा जीव घेतला आहे. पाळण्याच्या दोरीनेच चिमुकलीच्या गळ्याला फास आवळला आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सध्या पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. ही घटना घाटकोपरच्या कामराज नगर मधील आहे.
मृत मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा बापाने वेळ साधून आपल्या चार महिन्याच्या मुलीचा जीव घेतला. संजय कोकरे असं आरोपी बापाचं नाव होतं. मुलगी नको आणि तिसरं बाळ नको म्हणून आरोपीने तिचा स्वतःच्याच हाताने जीव घेतला. आई घरात आल्यानंतर बाळ निपचित पडल्याचं पाहून ती घाबरली. आपलं बाळ गेल्याचा मोठा धक्का आईला बसला आहे. नक्की वाचा: Aurangabad Shocker: औरंगाबादमध्ये 32 वर्षीय व्यक्तीने केला पोटच्या मुलीचा खून; आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न .
घाटकोपरच्या या घटनेनंतर पत्नीने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पती विरूद्ध तक्रार केली यानंतर तात्काळ पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपी बापाच्या हातात बेड्या ठोकल्या. मीडीया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसरे मूल मुलगी असल्याने आरोपी रागावला होता, त्यामुळे तो रोजच पत्नीला मारहाण व भांडण करत होता. तिसरे मूलही मुलगी असल्याने संजय कोकरे असमाधानी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.