Shreyas Iyer And Axar Patel (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) 12 वा सामना आज 2 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. हे दोन्ही संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. हा शेवटचा गट सामना आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने 79 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने पाच विकेट्स घेतल्या.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची वाईट सुरुवात झाली. दोन्ही सलामीवीरने स्वस्तात विकेट गमावल्या. त्यानंतर विराट कोहली 11 धावांवर बाद झाला. मग श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने 98 धावांची भागीदारी रचली. श्रेयस अय्यरने 79 धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त हार्दिक पंड्याने 45 धावा केल्या. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत नऊ विकेट गमावून 249 धावा केल्या. (हे देखील वाचा: Virat Kohli च्या विकेटवर Anushka Sharma ची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल, पाहा..)

न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. मॅट हेन्री व्यतिरिक्त काइल जेमिसन, रचिन रवींद्र, विल्यम ओ'रोर्क आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकांत 250 धावा कराव्या लागतील.