
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ने आज (1 मार्च) तिचं X अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. याबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत तिने अलर्ट केलं आहे. या अकाऊंट वरून शेअर केलेल्या लिंक्स वर क्लिक न करण्याचं आवाहन तिने केलं आहे. श्रेया घोषालाने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डल वरून माहिती देताना 13 फेब्रुवारी पासून X account हॅक झाल्याची माहिती दिली आहे. सध्या एक्स वरील अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं तिने म्हटलं आहे.
श्रेया घोषालने केलेल्या पोस्ट मध्ये तिने तिचे अकाऊंट हटवू शकत नाही कारण तिला ते ॲक्सेस करता येत नाही. "कृपया कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा त्या खात्यावरून लिहिलेल्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. ते सर्व स्पॅम आणि फिशिंग लिंक्स आहेत. खाते पुन्हा करण्यासाठी आणि सुरक्षित असल्यास मी व्हिडिओद्वारे वैयक्तिकरित्या अपडेट करेन," असे ती पुढे म्हणाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अभिनेत्री स्वरा भास्करचे X अकाऊंट देखील हॅक झाले होते आणि नंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले.
View this post on Instagram
दरम्यान,