Fire on Plane: पक्षी धडकल्यानंतर फेडेक्स विमानाला लागली आग; करावे लागले आपत्कालीन लँडिंग (Watch Video)

अमेरिकेत विमान अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. फेडेक्सच्या विमानाला उड्डाण करताना आग लागली. त्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

Fire on Plane: पक्षी धडकल्यानंतर फेडेक्स विमानाला लागली आग; करावे लागले आपत्कालीन लँडिंग (Watch Video)
PC-X

Fire on Plane: अमेरिकेत विमान अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा फेडेक्स विमानाला उड्डाण करताना आग (FedEx Plane Caught Fire) लागली. त्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यामध्ये कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शनिवारी नेवार्क विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच फेडेक्स विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विमानाला पक्षी आदळल्यानंतर इंजिनमध्ये आग लागली. हे यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर @News1IndiaTweet या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

विमानात आग

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).