WhatsApp ला Google देणार टक्कर, उतरवले हे शानदार चॅटिंग अ‍ॅप
WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

जगभरातील इंस्टंट मॅसेजिंग अॅप WhatsApp चा सर्वाधिक वापर केला जातो. दरम्यान नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार WhatsApp च्या वादामुळे चर्चेचा विषय ठरला होते. अशातच काही अन्य इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म सारखे Telegram ही उतरवण्यात आले आहे. मात्र टेलिग्रामला व्हॉट्सअॅप कडून कोणतेही यश मिळाले नाही. पण आता गुगलकडून WhatsApp आणि Telegram ला टक्कर देण्यासाठी Gmail अॅपमध्ये एक शानदार फिचर दिले आहे.

म्हणजेच जीमेल युजर अॅन्ड्रॉइड आणि iOS डिवाइसमध्ये Google Chat App इंटिग्रेट करता येणार आहे.

गुगल चॅट अॅपच्या माध्यमातून युजर्सला आता मेलसह व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगसाठी Meet आणि Room चे सपोर्ट दिले जाणार आहे. जीमेलचे चॅट अॅप Google Workspace युजर्ससाठी उपलब्ध केले होते. जे पर्सनल जीमेल अकाउंटसाठी सुद्धा उपलब्ध केले जाणार आहे. सोप्प्या शब्दात बोलायचे झाल्यास काही युजर्सला आता अॅपच्या खाली चार टॅब मिळणार आहेत. नवे चॅटिंग फिचर रोलाउट केल्यानंतर गुगलकडून Hangouts अॅप बंद केले जाऊ शकते. आता पर्यंत जीमेल युजर्स हॅंगआउटच्या माध्यमातून चॅटिंग करु शकत होते.(WhatsApp New Privacy Policy: व्हॉट्सअ‍ॅपची नवीन पॉलिसी काय आहे? हे धोरण Accept न केल्यास उद्यापासून 'हे' फिचर्स होणार बंद)

>'या' पद्धतीने करा वापर

-Google च्या नव्या चॅटिंग फिचरचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात प्रथम Gmail अॅप अपडेट करावे लागणार आहे.

-यासाठी अॅन्ड्रॉइड युजर्सला Google Play Store आणि iOS युजर्सला Apple App स्टोरवर व्हिजिट करावी लागणार आहे.

-अॅप अपडेट झाल्यानंतर युजर्सला जीमेल सुरु करावे लागणार आहे. तुम्हाला टॉप लेफ्ट स्क्रिनवर सँडविच बटण वर क्लिक करावे लागणार आहे. ते साउंडबार ऑप्शनमध्ये सुरु होणार आहे.

-त्यानंतर स्क्रॉल डाउन केल्यानंतर सेटिंग ऑप्शनमध्ये जावे.

-आता पर्सनल अकाउंट निवडावे लागणार आहे.

-येथे तुम्हाला Chat ऑप्शन दिसणार आहे. ते अनेबल करता येणार आहे.

-आता जीमेल अॅप रिस्टार्ट करा.

-जीमेल अॅपच्या खाली चॅटिंगमध्ये ऑप्शन दिसणार असून युजर्सला अगदी सहज चॅटिंग करता येणार आहे.

दरम्यान,येत्या काळात व्हॉट्सअॅप एक नवे फिचर सादर करणार आहे. या फिचरमुळे डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप ओपन करण्यासाठी मोबाईल वापरावा लागणार नाही. सध्याच्या काळात टेलीग्राम (Telegram), फेसबुक (Facebook), सिग्नल (Signal) यांसारखे अनेक अॅप्स युजर्संना ही सुविधा प्रदान करतात. लवकरच व्हॉट्सअॅप देखील आपल्या युजर्संना ही सुविधा देणार आहे.