WhatsApp New Privacy Policy: व्हॉट्सअ‍ॅपची नवीन पॉलिसी काय आहे? हे धोरण Accept न केल्यास उद्यापासून 'हे' फिचर्स होणार बंद
WhatsApp-Privacy-Policy-FAQs (Photo Credits: File Image)

WhatsApp New Privacy Policy: इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन पॉलिसी अपडेट स्वीकारण्यासाठी आता वापरकर्त्यांकडे थोडाचं वेळ शिल्लक आहे. नवीन धोरण 15 मेपासून लागू होणार आहे. सध्या, कोणत्याही वापरकर्त्याचे खाते हटविले जाणार नाही. परंतु, कंपनीने असेही सांगितले आहे की, जर कोणीही गोपनीयता धोरण स्वीकारले नाही तर कालांतराने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची कार्यक्षमता कमी होईल. हे धोरण न स्वीकारल्यास आपण कोणते फिचर्स वाररण्यास असमर्थ असाल, यासंदर्भात जाणून घेऊयात.

या सेवांवर येणार बंदी -

व्हॉट्सएपने आपल्या गोपनीयता धोरणाबद्दल शुक्रवारी काही खुलासे केले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वापरकर्त्याने ही पॉलिसी स्विकारली नाही तर व्हॉट्सअॅपची अनेक फिचर्स त्यांना उपलब्ध होणार नाहीत. यानंतर, कंपनी त्यांना Limited Functionality Mode मध्ये ठेवेल. (वाचा - WhatsApp लवकरच सादर करेल खास फिचर; मोबाईल शिवाय Desktop वर करता येईल लॉगइन)

वापरकर्ते त्यांच्या चॅटलिस्टमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. परंतु, तरी त्यांना इतर वापरकर्त्यांकडून चॅट मिळेल. मात्र, त्यांना यासंदर्भात केवळ नोटिफिकेशन्स मिळेल. ते हे नोटिफिकेशन्स पाहून प्रत्युत्तर देण्यात सक्षम असतील. वापरकर्त्यांना येणारे ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल प्राप्त होऊ शकतात, परंतु अटी अद्याप न स्वीकारणारे वापरकर्ते ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करण्यास सक्षम असतील की नाही हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, फेसबुकच्या मालकीची कंपनी आता जे वापरकर्ते गोपनीयता धोरण स्वीकारणार नाहीत, अशा वापरकर्त्यांच्या खात्यातील फिचर्स मर्यादित करेल. म्हणूनचं व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना नवीन गोपनीयता धोरणाबद्दल रिमाइंडर पाठवत राहील.