WhatsApp लवकरच सादर करेल खास फिचर; मोबाईल शिवाय Desktop वर करता येईल लॉगइन
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) गरजेनुसार आपल्या युजर्संसाठी नवनवीन फिचर्स सादर करत असतं. काही काळात व्हॉट्सअॅप एक नवे फिचर सादर करणार आहे. या फिचरमुळे डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप ओपन करण्यासाठी मोबाईल वापरावा लागणार नाही. सध्याच्या काळात टेलीग्राम (Telegram), फेसबुक (Facebook), सिग्नल (Signal) यांसारखे अनेक अॅप्स युजर्संना ही सुविधा प्रदान करतात. लवकरच व्हॉट्सअॅप देखील आपल्या युजर्संना ही सुविधा देणार आहे. (1 मे पासून बदलत आहेत हे नियम; आजचं करा 'हे' काम अन्यथा WhatsApp सह ही सेवा होईल बंद)

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने नव्या बीटा टेस्टनंतर युजर्स थेट डेस्कटॉप (Desktop) किंवा लॅपटॉपवर (Laptop) हे अॅप ओपन करु शकतात. त्यानंतर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप ओपन करण्यासाठी क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करणे जुने होईल. या स्थितीत एका वेळी केवळ 4 डिव्हाईसचा वापर केला जाऊ शकतो. दरम्यान, या फिचरची मागणी युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून करत होते.

या नव्या फिचरनंतर टेलीग्राम, फेसबुक, सिग्नल, स्काइप यांसारख्या स्पर्धकांसोबत व्हॉट्सअॅप बरोबरीत उतरेल. विशेष म्हणजे मोबाईल चोरी झाल्यानंतरही युजर्स व्हॉट्सअॅप डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये ओपन करु शकतात.

हे नवे फिचर व्हॉट्सअॅपच्या मल्टी डिव्हाईस (Multi-Device Feature) फिचरचा एक भाग असेल. या फिचरमुळे युजर्स एकाच अकाऊंटला एकाच वेळी चार डिव्हाईसवर ओपन करु शकेल. मेन डिव्हाईससाठी इंटरनेट कनेक्शनची देखील गरज भासणार नाही. या फिचरची सध्या टेस्टिंग सुरु आहे. लवकरच हे फिचर लॉन्च करण्यात येईल. दरम्यान, हे नवे फिचर युजर्ससाठी फायदेशीर ठरेल आणि त्यांच्या पसंतीसही पडेल, यात वाद नाही.