'9 वाजता, 9 मिनिटं', पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) केलेले देशाच्या एकतेसाठीचे आवाहन सुपरहिट ठरले. रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं देशभरातील सर्व नागरिकांनी घरातील दिवे बंद केले आणि बाल्कनी किंवा गच्चीवर दिवे, मेणबत्त्या आणि मोबाईल फ्लॅशलाइट लावला. लॉकडाऊनच्या वेळी घरात उपस्थित लोकांना एकटे वाटू नये म्हणून पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला कोरोना व्हायरसच्या अंधाराविरूद्ध महासत्ता जागृत करण्याचे आवाहन केले होते. संपूर्ण देशाने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि टीम इंडियाच्या (Indian Team) दिग्गज खेळाडूंनीही यात भाग घेतला. भारतीय क्रिकेटपटूंनीही यात भागीदारी दर्शविली आणि देशाच्या एकतामध्ये त्यांचा वाटा उचलला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), मर्यादित षटकारांचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), सुरेश रैनाने सहकुटुंब त्यांच्या घरी दिवे लावले आणि त्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केले.
टीम इंडियाचा कर्णधार विराट यांनी पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासमवेत रात्री 9 वाजता दीप प्रज्वलित केले. त्याने सर्व देशवासियांनी एकत्र उभे राहण्याचे आवाहन केले.
A prayer in unity does make a difference. Pray for every being and stand together 🙏 https://t.co/EcmiX7EcoA
— Virat Kohli (@imVkohli) April 5, 2020
रोहितने पत्नी रितिका आणि मुलगीसमवेत आपल्या घराच्या बाल्कनीत मेणबत्ती लावली.
सचिन तेंडुलकर यानेही डॉक्टर आणि पोलिसांसाठी दिवे लावून आभार मानले. सोबतच त्याने लिहिले की कोरोनाविरुद्ध संपूर्ण देश एकजूट आहे. आपल्या वडीलधाऱ्यांच्या काळजी घेण्याविषयीही तो म्हणाला.
My family & I thank the selfless #SanitationWarriors cleaning our surroundings & hospitals, disinfecting affected areas & thus keeping the virus at bay. Let’s also reignite our pledge to take care of our elders, the most vulnerable - by ensuring their physical & mental wellness. pic.twitter.com/tTheS9oO4I
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 5, 2020
याशिवाय, अनिल कुंबळे, सुरेश रैना, हरभजन सिंह यांनी त्यांच्या परिवारासह रात्री 9 वाजता घराचे दिवे बंद करून दिवे लावले.
#solidarity #LightofHope #positivity #IndiaFightsCoronavirus #StayHomeStaySafe pic.twitter.com/UPXWm7dnxL
— Anil Kumble (@anilkumble1074) April 5, 2020
आपण करू शकतो!! रैना म्हणाला. रैनाने देशातील प्रत्येकाला एकजुट होण्याचे आवाहन केले आणि म्हणाला “या भयंकर घटनेला पराभूत करून ज्याचा सामना संपूर्ण जग करत आहे.”
#9बजे9मिनट, let’s stand is solidarity & beat this terrible time the whole world is going through. We can do it India! #COVID2019 #9baje9mintues @PMOIndia @narendramodi pic.twitter.com/gyVOGWG2cw
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 5, 2020
हरभजन सिंह, पत्नी गीता बास्रा आणि मुलगी हीनाया
There is always a light at the end of every tunnel.. together we stand 🇮🇳 for better tomorrow.. God bless us all 🙏 @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/hvS8hDaeeS
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 5, 2020
चला कोविड-19 विरोधात लढा देऊया
We all are together in these difficult times #IndiaFightsCornona #9बजे9मिनट @narendramodi @PMOIndia @KirenRijiju pic.twitter.com/HtlAvTUcFe
— Manika Batra (@manikabatra_TT) April 5, 2020
मेरी कॉम
In solidarity toward #IndiaFightsCoronavirus #9MinutesForIndia. pic.twitter.com/y2OIFiGWTH
— Mary Kom (@MangteC) April 5, 2020
मोहम्मद कैफ
To, all the doctors, medical staff, sanitation workers, govt. employees, police and army personnel, media personnel, bankers, essentials’ shopkeepers and all other warriors fighting #COVID19
We are in your debt and ever thankful. 🙏🏻
Jai Hind! 🇮🇳#9baje9minute #9बजे9मिनट pic.twitter.com/eD3EW1ZISj
— Mohammad Kaif (@MohammadKaif) April 5, 2020
हम होंगे कामयब-वीरेंद्र सहवाग
In solidarity with each and every single person who is playing their part. We are all in this together and shall overcome this soon.
Om Shantih Shantih Shantih#9बजे9मिनट pic.twitter.com/Q32a1cZRpa
— Virender Sehwag (@virendersehwag) April 5, 2020
एकत्र आम्ही उभे आहोत-हार्दिक पांड्या
Wonderful to see the entire country come together to show our heartful gratitude and support for the healthcare staff.
Amazing initiative for all of us to be a part of.
Together we stand united 🤝 stronger 💪 and even more determined to fight these difficult times.
Jai Hind. pic.twitter.com/1AsTbUA32K
— hardik pandya (@hardikpandya7) April 5, 2020
प्रकाश आपले मार्गदर्शन करेल
The light will guide us home 🌍 pic.twitter.com/sj1DtyfCT2
— K L Rahul (@klrahul11) April 5, 2020
सुशील कुमार
Let their be light.. together we will come out of this darkness 🕯🪔#एकदियादेशकेनाम #9बजे9मिनट @narendramodi जी pic.twitter.com/bw2xkXQiic
— Sushil Kumar (@WrestlerSushil) April 5, 2020
सायना नेहवाल
🙏🙏🙏 #9pm9minutes pic.twitter.com/PrgZP3zCWD
— Saina Nehwal (@NSaina) April 5, 2020
पंतप्रधानांनी यापूर्वी संपूर्ण देशाला साथीदार म्हणून एकत्रित लढा देण्यासाठी एकत्रित इच्छेचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते. 50 हुन अधिकचा मृत्यू झाला आहे तर भारतात 3000 पेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. सध्या भारतात 21 दिवसांचे लॉकडाउन सुरु आहे.