ICC WTC Final 2021: टीम इंडियाचा प्लॅन तयार, Virat Kohli आणि Ravi Shastri यांच्यातील संवादाचा ऑडिओ सोशल मीडियात व्हायरल
विराट कोहली आणि रवि शास्त्री (Photo Credit: Twitter)

न्यूझीलंड (New Zealand) विरोधात 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यासाठी टीम इंडिया  (Team India) इंग्लंडला रवाना झाली आहे. साउथॅम्प्टन गाठल्यावर भारतीय संघाला काही दिवस आयसोलेशनमध्ये राहायचे आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी पत्रकारांशी व्हर्चुअली संवाद साधला. तथापि या दरम्यान पत्रकार परिषदेतील विराट आणि शास्त्री यांच्यातल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. कोहली आणि शास्त्री यांच्यात काही चर्चा चालू होती आणि ते लाईव्ह होते हे त्यांना ठाऊक नव्हते. दोघेही टीम इंडियाच्या गोलंदाजी हल्ल्याबद्दल बोलत होते. (Team India इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना; पहा फोटोज)

या संवादात विराट टीम इंडियाच्या बोलिंग अटॅकवर बोलताना ऐकू येऊ शकतो. ‘हम इनको राऊंड द विकेट डालेंगे, लाला सिराज इनको शुरु से ही लगा देंगे’, त्यावर विराटच्या मतावर सहमती दर्शवत, ‘हम्म, बराबर…’ असं रवी शास्त्री म्हणतात. विराट-शास्त्रींच्या या संभाषणाचा हा ऑडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांच्या संभाषणानुसार, अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि मोहम्मद शमी (लाला) दोघेही किवी संघाविरुद्ध भारताच्या इलेव्हनमध्ये दिसू शकतात. मात्र, निर्णायक सामन्यात कोणते 11 खेळाडू भारतासाठी मैदानात उतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला पोहोचणे हे 4 ते 6 वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला. “आम्ही अंतिम सामन्यांसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि कोणीही आमच्याकडून हे हिरवी शकणार नाही! आम्ही WTC फायनल सामना खळणार यात शंका नाही. कोहली पुढे म्हणाला, “हे फुटबॉलसारखे आहे, आम्ही आमचे मानक उंच ठेवले पाहिजे.” आयसीसी स्पर्धेच्या फायनल सामन्यात 18 जून रोजी भारत-न्यूझीलंडची टक्कर होणार असून ब्रिटनमधील अनिवार्य क्वारंटाईनमुळे तयारीसाठी त्यांच्याकडे कमी वेळ असेल. दुसरीकडे, ब्लॅककॅप्स आधीच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लिश मैदानावर खेळत आहेत. तिथे त्यांना खेळण्याच्या परिस्थितीची कल्पना येईल त्यामुळे, किवी संघाला याचा फायदा मिळू शकतो.