Narendra Modi | Prime Minister Narendra Modi (Photo/ @bjp4india)

जागतिक मानसिक आरोग्य दिन आपल्याला मानसिक आरोग्य हे आपल्या सर्वांगीण कल्याणाचा एक मूलभूत भाग असल्याचे ठळकपणे स्मरण करून देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.आजच्या वेगवान जगात हा दिवस आत्मपरीक्षण करण्याचे आणि इतरांविषयी सहानुभूती बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. मानसिक आरोग्याविषयीच्या संवादाला मुख्य प्रवाहात अधिकाधिक स्थान मिळेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पंतप्रधानांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असलेल्या आणि इतरांना बरे करून त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे कौतुक देखील केले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश

जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणजे मानसिक आरोग्य हा आपल्या सर्वांगीण कल्याणाचा एक मूलभूत भाग असल्याचे ठळकपणे स्मरण करून देणारा दिवस आहे. या वेगवान जगात, हा दिवस आत्मपरीक्षण करण्याचे आणि इतरांविषयी सहानुभूती बाळगण्याचे महत्व अधोरेखित करतो. मानसिक आरोग्याबद्दलचे संवादाला मुख्य प्रवाहात अधिकाधिक स्थान मिळेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सामूहिकपणे काम करू या. या क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच इतरांना बरे होण्यास आणि जीवनात आनंद मिळवून देण्यास मदत करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो.