 
                                                                 IND vs WI 1st Test 2025: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी दिल्ली येथे सुरू झाली आहे. पहिल्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर भारताचे लक्ष्य आता ही मालिका २-० ने जिंकण्याचे आहे. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलने इंग्लंड दौऱ्यापासून कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळली. तेव्हापासून त्याने सलग सहा सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली होती (इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी आणि वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी). सलग टॉस हरण्याचा हा 'कलंक' गिलने दिल्ली कसोटीत नाणेफेक जिंकून दूर केला. कर्णधार म्हणून गिलचा हा पहिला टॉस विजय आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia won the toss and elected to bat.
Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/A3KoVrucmM
— BCCI (@BCCI) October 10, 2025
भारतीय संघात कोणताही बदल नाही
पहिल्या कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने संघात कोणताही बदल केलेला नाही. तर वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने संघात दोन बदल केले आहेत. टेविन इमलाच आणि अँडरसन फिलिपचा वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला आहे.
मोठी अपडेट! २०२७ वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयचा मास्टर प्लॅन; संघात रोहित-विराटचा समावेश निश्चित
टीम इंडियाचा प्लेइंग ११: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिजचा प्लेइंग ११: जॉन कॅम्पबेल, टेगनारिन चंद्रपॉल, अॅलिक अथानासे, शाई होप, रोस्टन चेस (कर्णधार), टेविन इमलाच (यष्टिरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
