इशांत शर्मा ने इंग्लंडविरुद्ध 2014 लॉर्ड्स टेस्ट दरम्यान एमएस धोनी बरोबर मजेदार चर्चेचा केला खुलासा (VIDEO)
भारत विरुद्ध इंग्लंड 2014 लॉर्ड्स टेस्ट (Photo Credit: Getty)

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीमने (Indian Team) 2011 मध्ये इंग्लंडचा (England) दौरा केला. या दरम्यान चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत भारताला इंग्लंडकडून 0-4 ने क्लीन स्वीपला समोर जावे लागले. शिवाय, आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारताने पहिले स्थानही गमावले. याचा बदला घेऊ इच्छित असलेली टीम इंडिया 2014 मध्ये पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर गेली. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या टीमचा भाग होते. नॉटिंघॅममधील पहिली कसोटी सामना अनिर्णीत राहिली आणि एलिस्टर कुक लॉर्ड्सच्या मैदानावर कमाल करू पाहत होती. भारताने हा समान जिंकून इंग्लंडमध्ये तब्बल 28 वर्षानंतर पहिल्यांदा टेस्ट सामना जिंकला होता. या सामन्याचा हिरो ठरला इशांत शर्मा (Ishant Sharma). इशांतने 74 धावांवर 7 गडी बाद केले. पण, सामन्यात जो रूट आणि मोईन अली यांच्या भागीदारीने भारताची डोकेदुखी वाढली होती. या टप्प्यावर कर्णधार धोनीने इशांतला शॉर्ट बॉल टाकण्याचा सल्ला दिला. याबाबतर स्वतः इशांतने खुलासा केला. (एमएस धोनीसाठी DJ ब्रावो ने बनवले नवीन गाणं, CSK ने शेअर केलेली खास झलक पाहून धोनीचे फॅन्सही करतील 'माही...माही'चा जयघोष)

“चौथ्या दिवसाच्या शेवटी मी आधीच कुक आणि बेलला बाद केले होते, माही भाईंनी सांगितले की येथून कोणी ड्रॉचा विचार करणार नाही. साहजिकच शेवटच्या दिवशी आमच्यावर दबाव होता. मोईन अली आणि रूट चांगले खेळत होते म्हणून माही भाईने काहीच होत नसल्यामुळे शॉर्ट बॉलिंग सुरू करण्यास सांगितले. जोपर्यंत आम्ही नवीन चेंडू घेत नाही तोपर्यंत त्याने शॉर्ट बॉल करायला सांगितले. आणि लंचपूर्वी मोईन अली बाद झाला. आम्ही दुपारच्या जेवणाला जात असताना माही भाईने मला सांगितले की तो मला शॉर्ट स्पेलमध्ये गोलंदाजी खारवेल आणि मला शॉर्ट गोलंदाजी करावी लागेल. मी त्याला सांगितले की आता सामन्याच्या समाप्तीपर्यंत त्याने मला गोलंदाजी करायला द्यावी,” गौरव कपूरच्या यूट्यूब शो आयसोलेशन प्रीमियर लीगवर ईशांत म्हणाला.

“मी ट्रॉटवर चार ओव्हर फेकल्यानंतर माही भाईने मला विश्रांती घेण्यास सांगितले पण मी गाडीतले इंधन चालू देण्यास सांगितले,” इशांत विनोदीपणे म्हणाला. लॉर्ड्सवरील या सामन्यात भारताने पहिल्या डावात 295 धावा केल्या. प्रत्युत्तरात भुवनेश्वर कुमारने 6 गडी केले आणि इंग्लंडला फक्त 25 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने इंग्लंड 300 हुन अधिक धावांचे लक्ष्य दिले, पण इशांतच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज धाराशाही झाले. परिणामी भारताने सामना 95 धावांनी जिंकला.