
India Natioanl Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना गुरुवार, 10 जुलैपासून लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हनजाहीर केली आहे. इंग्लंडच्या कसोटी संघात बऱ्याच काळानंतर स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची पुनरागमन झाले आहे. आर्चरला जोश टंगच्या जागी अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले आहे. इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हा एकमेव बदल केला आहे; इतर सर्व खेळाडू कायम आहेत.
JUST IN: Jofra Archer is set to make his return to Test cricket after a gap of more than four years #ENGvIND pic.twitter.com/SPGfUsUHSQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 9, 2025
लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मिळू शकते मदत
विशेष म्हणजे, इंग्लंडने या कसोटीसाठी 16 सदस्यीय संघात गस एटकिंसनला स्थान दिले होते, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे आर्चरची उपस्थिती इंग्लंडसाठी फायदेशीर ठरू शकते. (हे देखील वाचा: ICC Test Rankings: लॉर्ड्स टेस्टआधी इंग्लंडचा खेळाडू कसोटीचा नंबर-1 फलंदाज, आयसीसीच्या ताज्या रँकिंगने सारेच हैराण!
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा खेळाडू संघ: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि शोएब बशीर.
तिसऱ्या कसोटीची A ते Z माहिती (भारत विरुद्ध इंग्लंड)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै दरम्यान लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
सामना सुरू होण्याची वेळ: भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता.
पहिला सत्र: दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत (दोन तास).
लंच ब्रेक: 40 मिनिटांचा, सायंकाळी 5.30 ते 6.10 पर्यंत.
दुसरे सत्र: सायंकाळी 6.10 ते रात्री 8.10 पर्यंत (दोन तास).
टी ब्रेक: 20 मिनिटांचा रात्री 8.10 ते 8:30 पर्यंत.
तिसरे सत्र: रात्री 8.30 ते रात्री 10.00 पर्यंत (दिवसाचा खेळ समाप्त).
जर पावसामुळे खेळात व्यत्यय आला, तर वेळेत बदल केला जाऊ शकतो. कसोटी क्रिकेट नियमांनुसार, एका दिवसात 90 षटकांचा खेळ होतो.
सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग
या रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय, तुम्ही तुमच्या मोबाईल, टॅब्लेट किंवा लॅपटॉपवर जिओ हॉटस्टारवर (Jio Hotstar) सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.