
ICC Test Rankings: भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून, दोन सामन्यानंतर ती 1-1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आहे. भारतीय संघाकडून शुभमन गिल, ऋषभ पंत, आणि केएल राहुल यांनी चमकदार कामगिरी केली आहे, तर इंग्लंडकडून हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनीही उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. या मालिकेत दोन्ही संघांतील अनेक खेळाडूंनी शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कसोटी फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट बऱ्याच काळापासून नंबर वन स्थानावर होता. मात्र, आता एका धडाकेबाज खेळाडूने एजबेस्टन कसोटीत तुफान धावा करून रूटला मागे टाकले आहे!
इंग्लंडचा हा धडाकेबाज फलंदाज बनला नंबर वन
इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक आता आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर वन स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने आपलाच संघातील अनुभवी खेळाडू जो रूटला मागे टाकले आहे. ब्रूक पहिल्या कसोटीत 99 धावांवर बाद झाल्याने शतक हुकले होते, पण दुसऱ्या कसोटीत त्याच्या बॅटमधून 158 धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली. ब्रूकच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच तो आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे.
हे देखील वाचा: India Beat England 2nd Test: एजबेस्टनमध्ये भारताचा 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय: इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारली, मालिकेत 1-1 बरोबरी!
आयसीसी कसोटी क्रमवारीतील टॉप-10 फलंदाज पहा
1- इंग्लंडचा हॅरी ब्रूक
2- इंग्लंडचा जो रूट
3- न्यूझीलंडचा केन विल्यमसन
4- भारताची यशस्वी जैस्वाल
5- ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ
6- भारताचा शुभमन गिल
7- दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा
8- भारताचा ऋषभ पंत
9- श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस
10- इंग्लंडचा जेमी स्मिथ
हॅरी ब्रूकचा कसोटी विक्रम
हॅरी ब्रूकने 2022 पासून कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे आणि आपल्या कारकिर्दीच्या अवघ्या तीन वर्षांत त्याने हे मोठे यश संपादन केले आहे. ब्रूकने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 27 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 45 डावांमध्ये या युवा खेळाडूने 2619 धावा केल्या आहेत. ब्रूक कसोटीत 59.5 च्या प्रभावी सरासरीने धावा करत आहे. विशेष म्हणजे, आपल्या या तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 317 धावांचा सर्वोच्च स्कोअरही केला आहे.