केरळमध्ये एका किंग कोब्राला वाचवणाऱ्या फॉरेस्ट बीट महिला अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवृत्त वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या या क्लिप मध्ये पारुथीपल्ली रेंजमधील अधिकारी जी.एस. रोशनी उथळ पाण्याच्या प्रवाहात साप पकडण्याच्या काठीने त्या प्रचंड सापाला कुशलतेने हाताळताना दिसत आहे. तिचे हे शौर्य आणि कौशल्य पाहून नेटकर्‍यांनी तिचं सोशल मीडीयत कौतुक केले आहे. PTI च्या वृत्तानुसार, अधिकारी जी एस रोशनी यांनी केरळ वन विभागात त्यांच्या जवळपास आठ वर्षांच्या कारकिर्दीत 800  हून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांची सुटका केली आहे.

महिला अधिकारीने केली कोब्रा ची सुटका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)