IND vs ENG (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना उद्या, म्हणजेच 10 जुलै रोजी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने, हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. इंग्लंडने पहिला सामना 5 गडी राखून जिंकला होता, तर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात 336 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd Test 2025: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे? किती कसोटी जिंकल्या, किती गमावल्या, जाणून घ्या!)

कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 10 जुलै ते 14 जुलै या या दरम्यान खेळवला जाईल. हा सामना लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.

सामना सुरू होण्याची वेळ: भारतीय वेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता.

नाणेफेक (Toss): दुपारी 3.00 वाजता (सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी).

या रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तसेच, तुम्ही तुमच्या मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर जिओहॉटस्टार (JioCinema) ॲपवर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

लॉर्ड्सवर भारताचा रेकॉर्ड 'अत्यंत खराब'

लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड  फारसा चांगला नाही. या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे, तर 12 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. उर्वरित 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. या आकडेवारीनुसार, लॉर्ड्सवर इंग्लंडचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, भारतीय संघाचा एजबेस्टनमध्ये गेल्या सामन्यातील ऐतिहासिक विजय पाहता, संघाचे मनोबल नक्कीच उंचावलेले असेल. त्यामुळे, टीम इंडिया लॉर्ड्सवरील आपला खराब रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल.

इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी संघ केला जाहीर, जोफ्रा आर्चरची वापसी!

इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी आपली प्लेइंग इलेव्हनजाहीर केली आहे. संघात केवळ एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे जवळपास चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्याला जोश टंगच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. आर्चरच्या वापसीमुळे इंग्लंडची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि शोएब बशीर.