Police | (Photo credit: archived, edited, representative image)

गायक आणि गीत लेखक येसर देसाई (Singer Yasser Desai )त्याच्या नव्या व्हिडिओमुळे सध्या अडचणीत आला आहे. सोशल मीडीयात सध्या येसरचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. ज्यात मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) वर रेलिंग वर उभा दिसत आहे. यामध्ये येसरने सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळेच तो अडचणीमध्ये आला आहे. पोलिसांनी सध्या भारतीय न्याय संहिता sections 285, 281, आणि 125 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

येसरचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर उभा राहून शूटिंग करताना दिसत होता. क्लिपमध्ये तो वरळी सी लिंकच्या रेलिंग वायरवर उभा राहून सार्वजनिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. गायकाविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर, वांद्रे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

येसरने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वांद्रे-वरळी समुद्रात तो कोणत्या प्रोजेक्टचे शूटिंग करत होता हे देखील अद्याप समोर आलेले नाही. कामाच्या बाबतीत, येसरने अलीकडेच "रूठा मेरा इश्क" हे गाणे रिलीज केले आहे, ज्यामध्ये प्रेम, हृदयभंग आणि सलोखा या खोल भावनांना चित्रित केले आहे. यासरने अमोल श्रीवास्तव आणि अभिषेक टॅलेंटेडसह संगीतबद्ध केलेले हे गाणे अमोल-अभिषेक या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केले आहे.

Singer Yasser Desai चा वायरल व्हिडिओ

यादरम्यान, येसरला "ड्राइव्ह" (2019) मधील "मखना", "सुकून" मधील "दिल को करार आया", "शादी में जरूर आना" (2017) मधील "पल्लो लटके" आणि "नैनो ने बंधी" (2018) मधील काही लोकप्रिय गाण्यांचे श्रेय जाते.