एमएस धोनीसाठी DJ ब्रावो ने बनवले नवीन गाणं, CSK ने शेअर केलेली खास झलक पाहून धोनीचे फॅन्सही करतील 'माही...माही'चा जयघोष (Video)
एमएस धोनी आणि ड्वेन ब्रावो शर्यत (Photo Credit: Getty)

लॉकडाउनमध्ये वेळ घालवत असणाऱ्या वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) खुलासा केला की तो चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) सहकारी आणि कर्णधार एमएस धोनीसाठी (MS Dhoni) नवीन गाणं तयार करीत आहे. ब्रावोच्या या नवीन गाण्याची एक झलक चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली. या आधीही ब्रावोने अनेक गाणी बनवली आहे आणि त्याचे 'चॅम्पियन' गाणं जगभर प्रसिद्ध आहे. ड्वेन ब्रावोला त्यांच्या संगीतासाठी डीजे ब्रावो म्हणून देखील ओळखले जाते. सीएसकेने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या गाण्याचा टीझरचा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले,"चॅम्पियन डीजे ब्रावोचे पुढील गाणे 'त्याच्या ब्रदर फ्रॉम अदर मदर'साठी आहे - एमएसधोनी-नंबर 7!!" 'एमएस धोनी, नं .7' शीर्षक असलेले हे गाणे ब्रावोने त्याच्या चाहत्यांसाठी सादर करून त्यांच्या गाण्याची झलक शेअर केली. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांनी या गाण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि म्हणाले की ते पूर्ण आवृत्तीसाठी थांबू शकत नाहीत. (IPL मध्ये एमएस धोनी म्हातारा म्हणून काढायचा छेड, 2018 फायनलनंतर धोनीने दिलेल्या शर्यतीच्या आव्हानाचा ड्वेन ब्रावोने केला खुलासा)

व्हिडिओमध्ये ब्रावो म्हणाला की, "मी तयार केलेल्या माझ्या नवीन गाण्याचा हा एक नमुना आहे. हे गाणे माझे भाऊ महेंद्र सिंह धोनीवर आहे." आयपीएलमध्ये गेल्या काही काळापासून धोनी आणि ब्राव्हो एकत्र खेळत आहेत. दोघेही चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहेत. 2008 म्हणजेच सुरुवातीपासूनच धोनी सीएसके संघाशी संबंधित होता, तर ब्रावो 2011 पासून चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य आहे. ब्रावोने यापूर्वी धोनीला त्याच्या खेळाचे श्रेय दिले आणि म्हणाला की त्याने त्याला त्याच्या शैलीत खेळण्याची परवानगी दिली.

पाहा ब्रावोच्या गाण्याचा हा टीजर:

या आठवड्याच्या सुरुवातीस ब्रावो म्हणाला की, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सीएसकेच्या डेथ ओव्हरच्या वेळी जेव्हा धोनी त्याच्यावर विश्वास ठेवतो. ब्राव्होने सीएसके बरोबरच्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान धोनी आणि मुख्य प्रशिक्षक स्टेफन फ्लेमिंग यांचे त्याच्यावरील विश्वासाबद्दल आभार मानले. "कर्णधार महेंद्र सिंह आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे." ब्राव्हो म्हणाला. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा (2010, 2011, 2018) आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. दुसरीकडे, या विंडीज अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर दोनदा पर्पल कॅप (एका मोसमात सर्वाधिक विकेट्स) जिंकल्या आहेत.