India Beat South Africa In T20 World Cup 2024 Final: भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर केला कब्जा, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी केला पराभव
Team India (Photo Credit - X)

IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या.

टीम इंडियासाठी सलामीवीर विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत विकेट गमावून केवळ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने 52 सर्वाधिक धावा केल्या.

टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठे कारण

मधल्या फळीत उत्कृष्ट फलंदाजी

बार्बाडोसमध्ये टीम इंडियाला सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पहिला मोठा धक्का बसला. रोहित शर्मानंतर विराट कोहलीने सावध खेळ करत डाव मोठ्या धावसंख्येकडे नेला. टीम इंडियासाठी विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी डाव सांभाळला आणि 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

विराट कोहलीची शानदार खेळी

टीम इंडियाने दोन विकेट गमावल्यानंतर विराट कोहलीने डावाची धुरा सांभाळली. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजांविरुद्ध सावध खेळ करत भरपूर धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या उत्कृष्ट खेळीत सहा चौकार आणि दोन मोठे षटकार ठोकले.

भेदक गोलंदाजी

संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. संघासाठी एका हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार गोलंदाजी केली. गोलंदाजांनी टीम इंडियाला सामन्यात दमदार पुनरागमन करायला लावले.