IND vs ENG T20I Head to Head Record: दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत-इंग्लंड आमनेसामने, जाणून घ्या दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs ENG (Photo Credit - Twitter)

IND vs ENG ICC T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत सामना आज भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर इंग्लंड संघाने अमेरिकेला एकतर्फी लढतीत पराभूत करून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. आता दोन्ही संघांमध्ये हायव्होल्टेज सामना होणार आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये, इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता भारतीय संघाला त्या पराभवाचा बदल घेवून फायनलमध्ये प्रवेश कारायचा आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.

टी-20 क्रिकेटमध्ये कोण आहे वरचढ

बाद फेरीत भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जोस बटलरच्या सेनेचा सामना करताना दिसणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 23 वेळा भिडले आहेत ज्यात भारताचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने 11 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडचा भारताशी चार वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. (हे देखील वाचा: IND vs ENG ICC T20 WC 2024 Semi-Final 2 Live Streaming: भारतीय संघाच्या नजरा अंतिम फेरीवर, इंग्लंडशी आज होणार लढत; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)

टी-20 विश्वचषक 2024 साठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले, ख्रिस जॉर्डन.