IND vs ENG ICC T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) उपांत्य फेरीचा दुसरा सामन्यात भारतीय संघ गुरुवारी इंग्लंडशी (IND vs ENG) भिडणार आहे. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. 2024 च्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. भारताला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. त्याचवेळी इंग्लंडला नुकताच दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता. मात्र, जोस बटलर आणि कंपनीने अमेरिकेविरुद्ध 10 गडी राखून विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडचा भारताशी चार वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.
गेल्या उपांत्य फेरीत भारताचा झाला होता पराभव
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये, इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. जॉस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने चमकदार कामगिरी करत भारताला दणदणीत पराभव दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे इंग्लंडने 16 षटकांत पूर्ण केले. आता भारतीय संघाला त्या पराभवाचा बदल घेवून फायनलमध्ये प्रवेश कारायचा आहे.
कधी अन् कुठे खेळवला जाणार सामना
भारत आणि इंग्लंड यामधील उपांत्य फेरीचा दुसरा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. चाहत्यांना हा सामना 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma's Epic Reply To Inzamam: 'कधी-कधी डोके वापरणेही गरजेचे'; इंझमाम उल हकच्या बॉल-टेम्परिंग आरोपांवर रोहित शर्माचे बेधडक उत्तर)
Unbeaten India look to continue their run in #T20WorldCup2024 while England aim to appear in consecutive #T20WorldCup finals! 😎
Will #TeamIndia avenge their World Cup 2022 loss and reach the #T20WorldCup2024Final❓#SemiFinal2 | #INDvENG | TODAY, 6 PM | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/nQsvBsM01R
— Star Sports (@StarSportsIndia) June 27, 2024
मोबाईलवर 'फ्री' लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
भारतात, टी-20 विश्वचषक 2024 उपांत्य फेरीमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'फ्री' असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.
टी-20 विश्वचषक 2024 साठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले, ख्रिस जॉर्डन.