Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडत आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ टाॅस शिवाय होऊ शकला नाही. त्यामुळे पंचांना खेळ रद्द करावा लागला होता. दुसऱ्या दिवशी भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला आहे. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. मॅट हेन्रीने 5 तर विल ओ'रुर्कने 4 विकेट्स घेतल्या.
1ST Test. WICKET! 31.2: Kuldeep Yadav 2(17) ct Michael Bracewell (Sub) b Matt Henry, India 46 all out https://t.co/8qhNBrs1td #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 17, 2024
भारताकडून पाच फलंदाज शून्यावर बाद
भारताकडून विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना खातेही उघडता आले नाही. ऋषभ पंत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जैस्वाल 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने 2 धावा केल्या. कुलदीप यादवलाही केवळ 2 धावा करता आल्या. सिराजने 4 धावांचे योगदान दिले.
मॅट हेन्रीने घेतल्या 5 विकेट
न्यूझीलंडसाठी हेन्रीने 13.3 षटकात 15 धावा देत 5 बळी घेतले. त्याने 3 मेडन ओव्हर्स घेतले. ओरुकने 12 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले. सौदीला 1 विकेट मिळाली.