Happy Birthday Anaiza: गौतम गंभीर ने खास 'Mankad' स्टाईल मध्ये दिल्या लेक अनीझाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, (View Post)
(Image Credit: Gautam Gambhir Instagram)

क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या गौतम गंभीर (Gautam Gambhir) ने राजकारणाच्या मैदानावर आपली दुसरा पारी सुरु केली आहे. मात्र, गंभीर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायलाही मागे राहत नाही. क्रिकेटमधून संन्यास घेतल्याने गंभीर आपली पत्नी आणि मुलींसोबत हवासा वेळ घालवता येत आहे. आजतर गंभीर आणि कुटुंबासाठी एक खास दिवस आहे. आज गंभीरच्या धाकटी मुलगी अनीझा (Anaiza) चा वाढदिवस आहे. या खास दिवशी गौतम गंभीरने आपल्या हटके अंदाजात आपल्या लेकीला ट्विटरवर विष केले आहे. (CWC 2019: शिखर धवन च्या World Cup मधून बाहेर झाल्याने गौतम गंभीर नाराज, चाहत्यांना रिषभ पंतसाठी केली ही विनंती)

ट्विटरवर आपल्या दोन्ही मुलींचा फोटो शेअर करत गंभीर ने मंकड (Mankad) चा संदर्भ लावून मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

2011च्या वर्ल्ड कप विजयात मुख्य भूमिका निभावणाऱ्या गंभीरने खासगी आयुष्यात सेकंड इंनिग सुरु केली आहे. 2019 च्या लोक सभा निवडणुकीत भाजप (BJP) च्या तिकिटावर पूर्व दिल्ली (East Delhi) तून उभ्या राहिलेल्या गंभीरने विजय मिळवला.