CWC 2019: शिखर धवन च्या World Cup मधून बाहेर झाल्याने गौतम गंभीर नाराज, चाहत्यांना रिषभ पंतसाठी केली ही विनंती
(Photo Credits: Getty)

अखेर भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) संपूर्ण विश्वकपमधून बाहेर पडला आहे. चाहत्यांप्रमाणेच क्रिकेट विश्वातील तज्ञांना याचे दुःख झाले आहे. धवनला ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सामन्यादरम्यान फलंदाजी करताना उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असूनही शिखर फलंदाजी करत राहिला. मात्र, तो फिल्डिंग करायला आला नाही. त्याच्या जागी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात उतरला. (ICC World Cup 2019: रिषभ पंत आहे शिखर धवनचा योग्य Replacement, ही आहेत 5 करणं)

धवनच्या बाहेर पडल्यानंतर त्याबाबत सांत्वना व्यक्त करताना माजी क्रिकेटपटू आणि बीजेपी खासदार गौतम गंभीर (Gautam Gambir) ने भावनात्मक ट्विट शेअर करत निराशा व्यक्त केली आहे. याच ट्विट द्वारे गंभीरने चाहत्यांना विनंती केली आहे की धवनच्या जागी खेळणाऱ्या रिषभ पंतवर दबाव आणू नये.

दरम्यान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शिखर काहीसा भावूक झालेला दिसून आला. धवन ने एक व्हिडिओ शेअर करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आणि चाहत्यांचे आभार मानत शो मस्ट गो ऑन अस म्हणाला.