शिखर धवन (Shikhar Dhawan) अखेर संपूर्ण विश्वकप मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant) चा संघात समावेश.धवन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यानं आता भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्याच्या जागी केएल राहुल (KL Rahul) सलामीला उतरणार आहे. भारताचा विश्वकपसाठी जेव्हा संघ जाहीर केला होता तेव्हा रिषभ पंतला जागा न दिल्यामुळे अनेकांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले हेते. मात्र, धवनला दुखापत झाल्याने पंतच योग्य पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. (ICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर शिखर धवन भावूक; चाहत्यांचे आभार मानत टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा Watch Video)

आपण बघूया 5 गोष्टी ज्या रिषभ पंतच्या बाजूने गेल्या असतील:

1. शिखर धवनसारखा पंतदेखील डावखुरा फलंदाजी करतो. त्यामुळे तो उत्तम धवनच्या जागी खेळायला उत्तम पर्याय ठरला. शिवाय पंत रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सलामीला ही येऊ शकतो. शिवाय चौथ्या क्रमांकासाठी उत्कृष्ट पर्याय आहे.

2. धवन आणि पंतच्या खेळामध्ये ही खूप साम्य आहे. दोघे आक्रमक खेळी खेळतात.

3. रिषभाचा इंग्लंड (England) मधील रेकॉर्ड चांगला आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे.

4. आयपीएल (IPL) मध्ये ही रिषभ पंतने चांगली कामगिरी बजावली होती. 16 सामन्यात 488 धावा केल्या. दिल्ली (Delhi) साठी खेळताना, पंतने काही सामने स्वबळावर जिंकून दिल्या आहेत.

5. पंत आपल्या विस्फोटक खेळीने मध्य-क्रमाला आणखी मजबूत करतो. के.एल राहुल रोहितसोबत सलामीला येत्या कारणाने, पंत चौथ्या क्रमांकावर येईल आणि भारताला मोठा स्कोर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.