Shikhar Dhawan (Photo Credits: Getty)

भारतीय क्रिकेट संघांचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे काही दिवसांपूर्वी वर्ल्डकपमधून बाहेर पडावं लागलं. मात्र तीन आठवड्यांनंतर पुन्हा एकदा शिखर संघांत परतेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींसह खेळाडूच्याही मनात होती. मात्र शिखर धवनला दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी अजून काही वेळ लागणार असल्याने शिखर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली. आता शिखर धवन ऐवजी रिषभ पंत याला संघांत खेळण्याची संधी मिळणार आहे.

वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शिखर काहीसा भावूक झालेला दिसून आला. तरी देखील टीम इंडियाला शुभेच्छा देत आणि चाहत्यांचे आभार मानत शो मस्ट गो ऑन असे शिखर म्हणतो आहे. त्यासाठी शिखर धवन याने खास व्हिडिओ शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ:

 

वर्ल्डकप मधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्स याचा चेंडू हाताला लागल्याने शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर शिखरला सक्तीची विश्रांती देण्यात आली आणि विजय शंकरला संघांत स्थान देण्यात आले. तर लोकेश राहुल याला शिखरच्या जागी सलामीची संधी मिळाली.