Team India (Photo Credit - Twitter)

Women's T20 World Cup 2023: महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनमध्ये  (Cape Town) 10 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान देशाचा संघ श्रीलंकेच्या (SA vs SL) संघाशी भिडणार आहे. 17 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला होणार आहे. या टी-20 विश्वचषकात 10 संघ सहभागी होत असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

प्रत्येक गटातील एक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. दोन्ही गटातील अव्वल 2-2 संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करतील. 10 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान गट टप्प्यातील सामने खेळवले जातील. यानंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला जाईल. (हे देखील वाचा: IND-W vs SA-W T20 Tri-Series Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार अंतिम सामना, दोघांपैकी कोण आहे वरचढ, घ्या जाणून)

गट-अ: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका

गट-ब: भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज

पूर्ण वेळापत्रक पहा:

10 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (केपटाऊन, रात्री 10:30)

11 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (पार्ल, संध्याकाळी 6:30 वाजता)

11 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (पार्ल, रात्री 10:30)

12 फेब्रुवारी: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6:30 वाजता)

12 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (केपटाऊन, रात्री 10:30)

13 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध इंग्लंड (पार्ल, संध्याकाळी 6:30 वाजता)

13 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (पार्ल, रात्री 10:30)

14 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (गेकेबेरा, रात्री 10:30)

15 फेब्रुवारी: टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, संध्याकाळी 6:30 वाजता)

15 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, रात्री 10:30)

16 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (गेकेबेरा, संध्याकाळी 6:30)

17 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (केपटाऊन, संध्याकाळी 6:30 वाजता)

17 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, रात्री 10.30)

18 फेब्रुवारी: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6:30)

18 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गेकेबेरा, रात्री 10:30)

19 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (पार्ल, संध्याकाळी 6:30 वाजता)

19 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (पार्ल, रात्री 10:30)

20 फेब्रुवारी: टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6:30)

21 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6:30 वाजता)

21 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (केपटाऊन, रात्री 10:30)

23 फेब्रुवारी: सेमी-फायनल 1 (केप टाऊन, संध्याकाळी 6:30)

24 फेब्रुवारी: उपांत्य फेरी 2 (केपटाऊन, संध्याकाळी 6:30)

26 फेब्रुवारी: अंतिम (केपटाऊन, संध्याकाळी 6:30)

कुठे पाहणार लाइव्ह सामना

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर महिला टी-20 विश्वचषकाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.