टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील त्रिकोणीय टी-20 मालिकेतील (T20 Tri-Seires) आज अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेत सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2023) अवघे काही दिवस उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिरंगी मालिका जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) पूर्ण आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरायचे आहे. या मालिकेत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. त्याचवेळी टीम इंडियाला मागील मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत कमकुवत असल्याचे सिद्ध झाले असून 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी संघाला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.
दोन्ही संघांच्या शेवटच्या काही सामन्यांवर नजर टाकली तर दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी 1-1 सामने जिंकले आहेत. आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेतून दोन्ही संघ आगामी विश्वचषकासाठी चांगली रणनीती तयार करतील. या मालिकेत टीम इंडियाला आपल्या सर्व प्रमुख खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला लॉरा वोल्वार्ड, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन या खेळाडूंकडून मोठ्या आशा आहेत. (हे देखील वाचा: Team India New Record In T20: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केला अनोखा विश्वविक्रम, पाकिस्तानचा 'हा' विक्रम काढला मोडीत)
हेड टू हेड आकडेवारी
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 15 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांपैकी टीम इंडियाने 10 सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ 4 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना निकालाविना संपला आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कर्णधार), यस्तिका भाटिया, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.
दक्षिण आफ्रिका: सुने लुस (कर्णधार), सिनालो जाफ्ता, लॉरा वोल्वार्ड, अनेके बॉश, लारा गुडॉल, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, तुमी सेखुखुने.