
Chennai Super Kings vs Mumbai Indians, IPL 2025 3rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. या हंगामातील दुसरा सामना आज म्हणजेच 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट टीम (CSK) आणि मुंबई इंडियन्स क्रिकेट टीम (MI) यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. (हे देखील वाचा: CSK vs MI T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी येथे पाहा)
हेड टू हेड आकडेवारी (MI vs CSK Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण 37 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या काळात, मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने 20 सामने आणि चेन्नई सुपर किंग्जने 17 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात, रोहित शर्माच्या शतकानंतरही, चेन्नई सुपर किंग्जने 20 धावांनी विजय मिळवला.
हा संघ जिंकू शकतो (CSK vs MI Match Winner Prediction)
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा वरचष्मा दिसतोय. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी आव्हानात्मक असू शकतो, विशेषतः चेन्नई सुपर किंग्जच्या मजबूत गोलंदाजी आणि फलंदाजीविरुद्ध. चेन्नई सुपर किंग्जच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, ते स्पर्धेतील तिसरा टी-20 सामना जिंकू शकतात. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
चेन्नई सुपर किंग्जची जिंकण्याची शक्यता: 53%
मुंबई इंडियन्स जिंकण्याची शक्यता: 47%.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम करन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराणा.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, रॉबिन मिंज, मिशेल सँटनर, कर्ण शर्मा, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट.