बेंगळुरूच्या (Bengaluru) केआर पुरम रेल्वे स्थानकावर (KR Puram Railway Station) आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. रेल्वे (Railway) पटरीवर येण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी एक प्रवासी रेल्वे फलाकावरुन घसरुन रुळावर पडला. संबंधीत घटना रेल्वे पोलिसाच्या लक्षात येताच प्रसंगावधानता आणि धाडस दाखवत या प्रवाशाचा जीव वाचवला. स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या या रेल्वे पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)