WPL 2025 4th Match Live Toss Update: महिला प्रीमियर लीग 2025 ला 14 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील चौथा सामना आज दिल्ली कॅपिटल्स महिला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला यांच्यात वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. यावेळी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंग करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चौथ्या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मॅरिझाने कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट-हॉज, एलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)