Shiv Jayanti 2025 Wishes (File Image)

Shiv Jayanti 2025 Wishes In Marathi: मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती, शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची उद्या जयंती (Shiv Jayanti 2025). छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.  भारतात, विशेषतः महाराष्ट्र राजेंना धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही महाराजांच्या जीवनाचा, कामगिरीचा, त्यांच्या शिकवणुकीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची स्थापना झाली, ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला बळ मिळाले.

आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांना एक शूर आणि दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जाते, ज्यांनी आयुष्यभर लोककल्याणासाठी लढा दिला. इ.स. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

असे हे थोर राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Quotes, WhatsApp Status, Images शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: Shivjayanti 2025: पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन; उद्या शहरातील अनेक भागात वाहतूक बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्था)

Shiv Jayanti 2025 Wishes
Shiv Jayanti 2025 Wishes
Shiv Jayanti 2025 Wishes
Shiv Jayanti 2025 Wishes
Shiv Jayanti 2025 Wishes

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. सर्वात आगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली. त्यानंतर 1895 मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुट्टी असते.

शिवाजी महाराजांची जयंती रायगडसह अनेक किल्ल्यांवर मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते. या दिवशी मिरवणुका निघतात, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी लोक महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतात आणि त्यांच्या कार्याचे गोडवे गातात.