Traffic Police (PC - wikimedia commons)

मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे भारतीय इतिहासातील सर्वात शूर आणि कुशल योद्ध्यांपैकी एक आहेत. त्यांच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली आहे. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात शौर्याचे उदाहरण आहेत. आता उद्या, 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवजयंती (Shivjayanti 2025) साजरी होत आहे. बुधवारी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त, पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक वळवण्याची आणि रस्ते बंद करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोडवरुन मिरवणूका निघत असतात. तसेच शिवजंयती निमित्त 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन केले असून, यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भागातील प्रामुख्याने जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व इतर रोडवर वाहतूक वाढून, सदर रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीत राहणेकरीता सदर परिसरात वाहतूक बदल करण्यात येत आहेत.

वाहतूक बदल-

जय शिवाजी जय भारत पदयात्रा: ही पदयात्रा इंजिनिअरींग कॉलेज ग्राऊंड- स.ग. बर्वे चौक- एसएसपीएमएस कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - स. गो. बर्वे चौक- मॉर्डन चौक - झाशी राणी चौक (होल्ट) खंडोजी बाबा चौक चौक - फर्ग्युसन कॉलेज मैदान अशी जाणार असल्याने, जंगली महाराज रोड वाहतुकीत 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 दरम्यान बदल करण्यात येत आहेत.

  • जंगली महाराज रोडवरील वाहतूक संचेती हॉस्पीटल चौक ते खंडोजी बाबा चौक पर्यंत आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- इंजिनिअरींग कॉलेज चौकाकडून येणारी वाहने डावीकडे कामगार पुतळा मार्गे नेहरु रोड व एम.जी. रोडने इच्छित स्थळी जातील. तसेच बाणेर, पाषाण, कोथरुड, कर्वेरोडकडे जाणारी वाहने उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक मार्गे विर चाफेकर उड्डाण पुलावरून व सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी जातील.

(सिमला ऑफिस चौक ते संचेती चौक हा मार्ग दुहेरी वाहतुक करण्यात येत आहे)

  • फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट, विर चाफेकर चौकपर्यंत आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग- कोथरुड, कर्वेरोड खंडोजी बाबा चौकात येणारी वाहतूक एस.एन.डी.टी. कॉर्नरमार्गे लॉ कॉलेज रोड, एस.बी रोड इ. मार्गे व नळस्टॉप चौक येथून उजवीकडे वळून कन्हेरी रोडमार्गे इच्छित स्थळी जातील.

  • टिळक रोडवरुन खंडोजीबाबा चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग- अलका टॉकीज चौकातून शास्त्री रोडने सेनादत्त चौक- बालशिवाजी नळस्टॉपमार्गे इच्छित स्थळी जातील.

  • केळकर रोडवरुन झेड ब्रिजमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग- गरुड गणपती चौक टिळक चौक - शास्त्रीरोडने इच्छित स्थळी जातील.

  • भिडे पूलमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग- झेड ब्रिज - गरुड गणपती चौक - टिळक चौक - शास्त्रीरोडने इच्छित स्थळी जातील.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहन पार्किंग बाबत-

  • खडकी, येरवडा, आर. टी. ओकडून येणाऱ्या वाहनांनी इंजिनिअरींग कॉलेज चौकात विद्यार्थी सोडून उजवीकडे वळून संगमवाडी पार्किंग येथे वाहने पार्किंग करावीत.
  • कर्वे रोड, कोथरुडकडून येणाऱ्या वाहनांनी अलका टॉकीज चौक येथून डावीकडेवळून नदी पात्रातील पार्किंग येथे पार्क करतील (व्ही.आय.पी./ संयोजक / क्रीडा अधिकारी यांची वाहने फर्ग्युसन कॉलेज ग्राऊंड येथे पार्क करावीत.)
  • स्वारगेट, हडपसर, दांडेकर पूलकडून येणारी वाहने सेनादत्त मार्गे अलका टॉकिज चौक येथून उजवीकडे वळून नदी पात्रातील पार्किंग येथे पार्क करतील.
  • पुणे विद्यापीठ, पाषाण, बाणेर इ. रोडने येणारी वाहने विद्यार्थी यांना सिमला ऑफिस चौकात सोडून यु टर्न करुन वाहने ॲग्री कॉलेज ग्राऊंड येथे पार्क करतील. (हेही वाचा: Delhi 98th Marathi Sahitya Sammelan: येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार 98 वे मराठी साहित्य संमेलन; PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

शिवजंयती मुख्य मिरवणूक मार्गावरील वाहतूक बदल-

दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वा. पासून गर्दीसंपेपर्यंत लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडवरील सर्व प्रकारच्या वाहतूकीत खालीलप्रमाणे बदल असेल.

शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतूक बदल- 

पर्यायी मार्ग-

  • जिजामाता चौक येथून शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणारी वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक टिळक चौक टिळक रोडने इच्छितस्थळी जातील. (जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपलेनंतर)
  • स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे. (जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपल्यानंतर)
  • कुंभार वेसकडून गाडगीळ पुतळ्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी कुंभारवेस चौक - उजवीकडे वळून राष्ट्रवादी कार्यालय - खुडे चौक - सावरकर चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. (जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपल्यानंतर)
  • गणेश रोड - दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक ही दारुवाला पूल चौकातून इच्छितस्थळी जाईल.
  • केळकर रोडने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.
  • मिरवणुक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोडवरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतून वळविण्यात येतील.
  • पूरम चौकातून बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी पूरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जाण्याचा मार्ग असेल. (जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपल्यानंतर)
  • मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रोडने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील. तसेच सेवासदन चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे न जाता लक्ष्मी रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाही, तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.
  • मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहने शनिवार वाड्याकडे न जाता ती कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पूल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.