
Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2025) महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर ‘शिवजन्मोत्स सोहळा’ साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन झाले. (Shivgarjana in Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी दिली जाणारी शिवगर्जना आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ; जाणून घ्या)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या शिवजन्मोत्सवाचे आयेजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित आहेत.
शिवनेरी गडावर भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा
◻️LIVE 📍शिवनेरी 🗓️19-02-2025 🙏🏻🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा - लाईव्ह https://t.co/s15cTTwa84
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 19, 2025
स्पर्धांच आयोजन,शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके
बैलगाडा शर्यत, कबड्डी स्पर्धा होणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. त्याशिवाय छत्रपती शिवरायांची महाआरती व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.