Photo Credit- X

Cidco Lottery: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या दिवशी शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडको महामंडळातर्फे (Cidco Lottery 2025) 21,399 घरांची सोडत काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही महासोडत होईल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे ही महासोडत होईल. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. (CIDCO Lottery 2025: उद्या, 19 फेब्रुवारीला निघणार सिडकोच्या 26,000 घरांसाठी सोडत; जास्त किमतीमुळे लॉटरीपूर्वीच अनेक अर्जदारांनी घेतली माघार)

सिडकोच्या घरांच्या किमती:

गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )

तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख

तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख

खारघर बस डेपो - 48. 3 लाख

बामणडोंगरी -31. 9 लाख

खारकोपर 2A, 2B -38.6 लाख

कळंबोली बस डेपो - 41.9 लाख

अल्प उत्पन्न गट एलआयजी -

पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख

खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख

तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख

मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख

खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख

खारकोपर ईस्ट - 40.3 लाख

वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख

खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख

सिडको योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता सदनिका उपलब्ध होतील.